भारतीय समाज विकास व संशोधन संस्था, संचालित

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय

खेडनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर ४१४४०३

संस्था
उपक्रम
  • राष्ट्रीय सेवा योजना
  • कामवा व शिका योजना
  • सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजना
  • व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम
  • बहि:शाल शिक्षण मंडळ
भा. स. वि.सं संस्थेचे कार्यकारी विश्वस्त, कृतीशील सामाजिक विचारवंत मा. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी जून २००१ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर चालू केले. यामुळे खेड पंचक्रोशीतील गरीब, होतकरू मुलामुलींना उच्च-शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. या परिसरातील मुला मुलींना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी कर्जत किंवा बारामती सारख्या ठिकाणी जावे लागत असे. याचा त्रास मुलीना मोठ्ठ्या प्रमाणावर होत होता. त्यामुळे मुलींचे शिक्षण थांबविले जाण्याचे प्रमाण जास्त होते. अशा वातावरणात मुलींच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये, त्या देखील मुलांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रात उतरल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे सर्व बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत, कोणाचेही शिक्षण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अडचणींमुळे थांबू नये अशी कार्यकारी विश्वस्तांची प्रामाणिक इच्छा आहे. याच हेतूने या महाविद्यालयाची वाटचाल सुरु आहे.